श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक प्रदर्शनात ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या स्टाॅलला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीराम प्रतिष्ठान संचलित आयोजित शैक्षणिक प्रदर्शन (ता.१६) वार रविवार रोजी साई नाट्य मंदिर येथे पार पडला.
यामध्ये ज्ञानतीर्थ विद्यालयाने सहभाग नोंदवला होता. या प्रदर्शनामध्ये ज्ञानतीर्थ विद्यालयांमध्ये शिकवल्या जाणारा अभ्यासक्रम, प्री स्कूलचे स्वनिर्मित पुस्तके, त्याच पद्धतीने शाळेत घेतले जाणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी, उपलब्ध कोर्सेस, शाळेत शिकवली जाणारी पद्धत आधी विषयाची माहिती या प्रदर्शनामधून उपस्थित पालकांना देण्यात आली.